ब्रिटनमधील आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर लावले देवीचे चित्र असलेले स्टिकर !
संतप्त हिंदूंकडून उत्पादन मागे घेण्याची मागणी !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील ‘बी.एन. मंगर’ या मद्यनिर्मिती करणार्या आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर देवीचे चित्र असलेले स्टिकर लावले आहे. यामुळे हिंदूंनी आस्थापनाचा निषेध करत ‘हे उत्पादन मागे घेऊन सदर स्टिकर हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदूंनी दिली आहे. ब्रिटनमधील हिंदू आणि भारतीय यांच्याशी संबंधित समस्यांवर आवाज उठवणार्या ‘इनसाइट यूके’ या सामाजिक माध्यमांवरील मंचाने याविषयीची माहिती दिली.
ब्रिटेन में बीयर की बोतल पर छपी हिंदू देवी की तस्वीर, वायरल होने पर मचा भारी बवाल. #Britain #BeerBottle #HinduGod https://t.co/nnb5DyaEfX
— ABP News (@ABPNews) January 12, 2023
यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये फ्रान्समधील ग्रेनेड-सुर-गोरोन नावाच्या मद्यनिर्मिती करणार्या आस्थापनाने ‘शिवा बिअर’ बाजारात आणली होती. त्यालाही हिंदूंनी विरोध केला होता. वर्ष २०१८ मध्ये डर्बीशायर नावाच्या मद्यनिर्मिती करणार्या आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर श्री कालीमातेचे चित्र असलेले स्टिकर लावले होते. त्यासही हिंदु संघटनांनी विरोध केला होता.
Bien Manger uses sacred image of Hindu Goddess on their beer bottle.@BienManger it’s highly insensitive, disrespectful & hurtful to #Hindus. The Goddess Hindus worship is being used on your beer bottles. We demand you recall all such products & stop further manufacturing of it. pic.twitter.com/NiSvQ47Hh1
— INSIGHT UK (@INSIGHTUK2) January 10, 2023
संपादकीय भूमिकाअशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते ! |