१५ जानेवारीला ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘कॅथ-लॅब’चा लोकार्पण सोहळा ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, रुग्णालयाचे संचालक
कोल्हापूर, १२ जानेवारी (वार्ता.) – पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘फिलिप्स अझ्युरीऑन मशीन’ हे (‘कॅथ-लॅब’) उच्च दर्जाचे तंत्रज्ञान रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा १५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’च्या प्रांगणात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अन् मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि मेंदूरोगतज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले. या पत्रकार परिषदेत विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले.
(सौजन्य : ACROSS STATE NEWS 7)
डॉ. मरजक्के पुढे म्हणाले, ‘‘ही सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार इतरत्र असणार्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के अल्प दरात आणि २४ घंटे उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’
पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावरगेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’अशी ओळख निर्माण केली आहे.
रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानाचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी १५ जानेवारी २०२३ सायं. ६ वाजता सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, रुग्णालय प्रांगण पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात
मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांच्या हस्ते संपन्न करण्याचे योजिले आहे.
तरी सदर लोकार्पण सोहळ्यास आपण उपस्थित राहावे, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण !
#sumangalm #neuro #MRI #medical #Sumangalam #siddhagirihospital #mrilaunch2023
_______________________________________
टाकाळा येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! – डॉ. संदीप पाटील
या प्रसंगी येथे उपस्थित असणारे डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘सिद्धगिरी मठ येथे फेब्रुवारीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम’ महोत्सवाचे कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता टाकाळा येथे उद्घाटन होणार आहे.
कोल्हापूर : 500 एकर परिसर अन् 30 लाख लोकांची उपस्थिती; कणेरी मठात होणारा 'सुमंगलम' महोत्सव आहे तरी काय? https://t.co/aDYgu64F7w
— ABP माझा (@abpmajhatv) November 25, 2022
________________________________________________
Eknath Shinde In Kolhapur : 'सुमंगलम'ने कोल्हापूरची मान जागतिक पातळीवर उंचावली जाईल, किर्तीमान महोत्सव करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही @CMOMaharashtra @mieknathshinde @dvkesarkar https://t.co/ZaQEQRa7jQ
— ABP माझा (@abpmajhatv) November 25, 2022
या महोत्सवासाठी आता राज्यशासनाचे विविध विभाग गतीशील झाले असून कार्यक्रमाची जय्यत सिद्धता सिद्धगिरी मठावर चालू आहे.’’