शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
१. ‘ए ५’ आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक. या पत्रकाचा वापर वितरणासाठी, तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठीही करता येईल.
२. उपलब्ध फलकांचे विषय
अ. गोब्राह्मणप्रतिपालक राजा ! (३.५ फूट Ñ २.२५ फूट)
आ. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय ! (३ फूट Ñ ४.५ फूट)
इ. छत्रपती शिवरायांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म रक्षण करा ! (४ फूट Ñ ८ फूट)
ई. शिवरायांचा आठवावा प्रताप (१० फूट Ñ ८ फूट)
उ. छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! (१० फूट Ñ ८ फूट)
टीप : शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणारे १२ फूट Ñ १० फूट या आकारातील ‘होर्डिंग’ही उपलब्ध आहे !
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा शिवजयंती उत्सव साजरा करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. यातील हस्तपत्रक दिनांकानुसार आणि तिथीनुसार साजरी करण्यात येणार्या शिवजयंतीच्या दिवशीही वापरता येईल.