सुट्टीच्या काळात सहकार्याला संपर्क साधल्यास १ लाख रुपये दंड !
मुंबईतील ‘ड्रीम ११ फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म’ आस्थापनाचा निर्णय !
मुंबई – येथील ‘ड्रीम ११ फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म’ या आस्थापनाने सुट्टीच्या काळात सहकार्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार्या कर्मचार्यांना १ लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आस्थापनाचे कर्मचारी प्रतिवर्षी एक आठवडा कामापासून दूर रहातील, असे ठरवण्यात आले आहे, अशी माहिती आस्थापनाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन यांनी दिली.