‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध लढण्यासाठी मी कुठेही यायला सिद्ध ! – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन न्यूज’
देहलीच्या जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘जनआंदोलन’
देहली – ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यकता असेल, तेथे उपस्थित रहायला मी सिद्ध आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये जर कोणत्याही मुलीची हत्या होत असेल, तर त्या प्रकरणाचा निपटारा ३० दिवसांच्या आत करण्यात यावा. तसेच त्या प्रकरणाचा खटला संपेेपर्यंत लव्ह जिहादीला जामीन देण्यात येऊ नये, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. ‘हिंदु महाकुंभा’निमित्त ८ जानेवारी २०२३ या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील जंतरमंतर येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात ‘‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करण्यात यावा’, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले होते.