हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
‘नोव्हेंबर २०२१ मध्ये सहसाधिका दिवाळीसाठी घरी गेली होती. त्या वेळी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित ‘नियोजन, संकलन आणि संरचना करणे अन् पाक्षिक छपाईला पाठवणे’ या सेवा करतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सेवा अल्प वेळेत होणे
अ. मी आणि सहसाधिका दोघी मिळून ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत असतांना जेवढा वेळ लागायचा, त्या तुलनेत मी एकटी असूनही मला सेवांचे सर्व टप्पे पूर्ण करायला अल्प वेळ लागला.
आ. दिवाळीच्या कालावधीत साधक घरी जात असल्याने आश्रमस्तरावरील सेवाही अधिक होत्या. सेवेच्या ठिकाणच्या अन्य सेवा आणि आश्रमसेवा करूनही ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा अल्प वेळेत पूर्ण झाल्या.
२. दिवाळीच्या कालावधीत सेवा करतांना ‘माझ्या हातांच्या बोटांना सुगंध येत आहे.’ असे माझ्या लक्षात आले.
३. ‘सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत आणि तेच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
४. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझा कर्तेपणा वाढू दिला नाही’, हे लक्षात येऊन मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटली.
५. आता सहसाधिका नसली, तरीही माझ्याकडून ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा आणि सेवेच्या ठिकाणच्या अन्य सेवा सुरळीत चालू रहातात.
६. ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना साधिकेला ‘त्रास देण्यासाठी अनिष्ट शक्ती आल्या आहेत आणि त्या वेळी प.पू. गुरुमाऊली सूक्ष्म रूपाने समवेत असल्याने पोशाखाला सुगंध येत आहे’, असे जाणवणे
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य होत असल्याने ही सेवा करतांना अनिष्ट शक्ती पुष्कळ अडथळे आणतात. वर्ष २०२२ मधील वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ची संरचना करत होते.
अ. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात होते. तेव्हा ‘माझ्या बाजूला सूक्ष्मातून २ अनिष्ट शक्ती आल्या आहेत’, असे मला जाणवले.
आ. मी त्यांच्याकडे सहजतेने दुर्लक्ष करून नामजप करत होते. तेव्हा माझी भावजागृती होत होती.
इ. त्या वेळी माझ्या पोषाखाला सुगंध येत होता; पण मला सेवा करतांना त्याची फारशी जाणीव नव्हती. मी सेवा पूर्ण करून खोलीत गेल्यावर माझ्या लक्षात आले, ‘अनिष्ट शक्ती मला त्रास देण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळीप.पू. गुरुमाऊली सूक्ष्म रूपाने समवेत असल्याने माझ्या पोषाखाला सुगंध येत आहे.’
ई. प.पू. गुरुदेवांनीच माझे त्या अनिष्ट शक्तींपासून रक्षण केले. त्यामुळे मी सेवा निर्विघ्नपणे करू शकले आणि मला सेवेतून आनंदही मिळाला.
क्षणोक्षणी आपल्या बालकांचे रक्षण करणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२२)
|