विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याविरोधातील याचिका फेटाळली !
कोल्हापूर – गतवर्षी वनविभागाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला. त्या विरोधात २५ अतिक्रमणकर्त्यांनी याचिका प्रविष्ट केली होती. अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने मनाई केली. १० जानेवारीच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला. ११ जानेवारीला न्यायालयाने ही गोष्ट दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट करत अतिक्रमणकर्त्यांची मागणी फेटाळली.