तरुणांकडून ‘कुत्ता गोळी’ या अमली पदार्थांच्या वापरात वाढ !
नाशिक आणि मालेगाव शहरांतील धक्कादायक प्रकार !
गोळी अल्प मूल्यात उपलब्ध !
नाशिक – नाशिक आणि मालेगाव या शहरांमध्ये सध्या ‘कुत्ता गोळी’ या अमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण तरुणांमध्ये पुष्कळ वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दारूपेक्षा या गोळीचे मूल्य अल्प असल्याने आणि ती सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांकडून तिचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
१. मालेगाव शहरात गुंगी आणणार्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी रईस शहार उपाख्य शहा याच्या ठिकाणी धाड टाकून त्याच्याकडून या गोळ्यांच्या १० सहस्र ८० रुपयांची २८० पाकिटे जप्त केली.
२. संबंधित संशयित हा त्याचा फरार साथीदार मुज्जमील याच्यासह मालेगाव शहरात विनापरवाना या गोळ्यांची विक्री करत होता. या प्रकरणी रईस शहार याला अटक करण्यात आली आहे.
३. मालेगाव शहरात अवैधरित्या गुटखाविक्री चालू असल्याचे समजल्यावर पोलिसांनी संशयित प्रवीण नेरकर, खलील अहमद महंमद इसाक, तसेच मनमाड येथील जमीरखान उस्मानखान पठाण यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या. त्यांच्यकडून ७० सहस्र ६०० रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
|