हल्द्वानी (उत्तराखंड) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमण !
|
हल्द्वानी (उत्तराखंड) – शहरात ९५ टक्के मुसलमान रहात असून ५ टक्के हिंदू रहात आहेत. येथे रहाणार्या अल्पसंख्यांक हिंदूंना मुसलमानांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील हिंदू अल्पसंख्य असल्यामुळे तेथील बहिणी-मुली सुरक्षित नाहीत. येथील हिंदू दहशतीखाली वावरत आहेत. येथे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद घडत असून हिंदूंचा सातत्याने छळ केला जात आहे. यामुळे हिंदू कंटाळून शहरत सोडण्याच्या सिद्धतेत आहेत.
Women harassed, children forced to learn Urdu and Namaz: Why isn’t the media interested in covering the plight of Hindus in Haldwani?
Writes @rahulppresshttps://t.co/bnhrjoVA7C
— OpIndia.com (@OpIndia_com) January 11, 2023
धर्मांधांच्या कारवायांमुळे हिंदूंची स्थिती बिकट !
हल्द्वानी येथे रेल्वेच्या भूमीवर अवैध बांधकाम करून रहात असलेल्यांना हटवण्याचा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. यावर ७ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या घटनेमुळे हलद्वानीचे नाव भारतियांसमोर आले; मात्र येथील हिंदूंवर धर्मांधांकडून होणार्या अत्याचारांकडे दुर्लक्ष होत आहे. येथील इंदिरानगर येथील ७२ वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, हा परिसर हिंदूंसाठी त्रासदायक आहे. येथील व्यसनी धर्मांध हिंदूंच्या घरांवर लाथा मारतात आणि त्यांच्यात दहशत निर्माण करतात.
मुसलमानांच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ !
१. गेल्या १० वर्षांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने वनभुलपुरा भागातील हिंदूंची परिस्थिती बिकट झाली आहे. तेथील एका हिंदूने सांगितले, ‘मुसलमानांची लोकसंख्या एकतर्फी कशी वाढते आणि लोक कुठून येतात ?’, हे कुणालाच ठाऊक नाही.
२. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक जोगिंदरसिंह जोगी यांनीही वनभुळपुरा येथे चरस आणि गांजा यांसारख्या अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती दिली.
३. शहरातील वनभुलापुरा येथील एका दिव्यांग हिंदूने सांगितले, ‘भारत सरकारने माझ्या कुटुंबाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे; कारण तेथील परिस्थिती हिंदूंना रहाण्यासाठी योग्य नाही.’
४. एका वयस्कर हिंदूने सांगितले की, १९६०च्या दशकात वनभुलपुरा हिंदुबहुल होता. आता तो मुसलमानबहुल झाला आहे. त्या भागातून हिंदूंचे पलायन चालूच असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मांधांकडून हिंदु महिलांचा छळ !
१. इंदिरानगर परिसरातील एका हिंदु तरुणाने सांगितले की, वनभुलपुरा भागात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असतात.
२. वनभुलपुरा येथील हिंदु महिलांनी सांगितले की, मुसलमान त्यांना रस्त्यात अडवतात. हिंदु भगिनी आणि मुली यांच्यावर अत्याचार केले जातात. निषेध म्हणून त्यांच्या घरात मांसही फेकले जाते.
धर्मांधांनी शिवमंदिर पाडले !एकेकाळी वनभुलपुरा भागात सत्यनारायण तिवारी नावाच्या व्यक्तीचे घर होते. घराजवळ त्यांनी एक शिवमंदिर बांधले होते. काही दिवसांनंतर ते घर सोडून निघून गेले. त्यानंतर मुसलमानांनी त्या घरासह मंदिरही पाडले आणि ती भूमी कह्यात घेतली. आता तेथे मुसलमान रहात आहेत. |
संपादकीय भूमिकाहल्द्वानी भारतात आहे कि पाकिस्तानात ? काश्मीरसारखी स्थिती भारतातील कानकोपर्यात निर्माण होत असेल, तर हिंदूंनी कुठे जायचे ? भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदूंना आश्वस्त करणे आवश्यक ! |