माझा पती आदिल खान हा दुसर्‍या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने आमच्या ७ मासांपूर्वी झालेल्या निकाहाचा मी उलगडा केला ! – अभिनेत्री राखी सावंत

  • पतीच्या सांगण्यावरून लपवली होती निकाहाची बातमी !

  • राखी सावंत उपाख्य फातिमा हिच्याकडून निकाह वाचवण्याचा प्रयत्न !

  • राखी सावंत हिच्याशी विवाह केल्यामुळे अपकीर्ती होण्याची पतीला होती भीती !

अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी

मुंबई – अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी याच्याशी २९ मे २०२२ या दिवशी निकाह केल्याचे नुकतेच उघड केले. २ जुलै २०२२ या दिवशी त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यात आली होती. राखी सावंत हिने म्हटले, ‘‘आदिलने मला निकाह झाल्याचे लपवून ठेवायला सांगितले होते. मी हे ७ मास लपवून ठेवले; पण आता तो दुसर्‍या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे मला समजल्याने मी आमचे हे गुपित सर्वांसमोर उघड करत आहे. आता मला माझा निकाह वाचवायचा आहे. आम्ही लग्न केले असल्याचे जगाला समजायला हवे. मला पुष्कळ त्रास होत आहे. त्यामुळेच मी लग्नाविषयी जाहीरपणे सांगून टाकले.’’ (आता निकाह वाचवण्यासाठी प्रयत्न करून काय उपयोग ? अशांच्या प्रेमात पडण्याअगोदरच हिंदु तरुणींनी या सर्वच गोष्टींचा विचार करायला हवा ! धर्मशिक्षणाअभावीच हिंदु तरुणी अशा गोष्टींना सहजपणे बळी पडतात ! – संपादक)

राखी सावंत पुढे म्हणाली,

१. काही मासांपूर्वी मी ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. त्याच कालावधीत आदिलचे दुसर्‍या अभिनेत्रीशी प्रेमसंबंध असल्याचे मला समजले. (हे आहे धर्मांधांचे खरे स्वरूप ! – संपादक)

२. आदिलला वाटत होते की, जर आमच्या निकाहाचे सत्य सर्वांना समजले, तर त्याच्या बहिणीच्या निकाहासाठी कुणीही मुलगा सापडणार नाही. ‘माझे नाव आदिलशी जोडले गेल्यास त्याची अपकीर्ती होईल’, असेही त्याला वाटत होते; म्हणून त्याने मला आमचा निकाह झाल्याचे लपवण्यास सांगितले होते. (स्वतःची अपकीर्ती टाळण्यासाठी वाटेल त्या थराला जाणारे स्वार्थी धर्मांध ! – संपादक)

३. निकाहानंतर माझे नाव ‘फातिमा’ ठेवण्यात आले होते.

‘लव्ह जिहाद’ची भीती वाटत आहे !

राखी सावंत म्हणाली, ‘‘मला आता ‘लव्ह जिहाद’ची भीती वाटू लागली आहे; कारण आदिलचे कुटुंबीय त्याच्यावर पुष्कळ दबाव टाकत आहेत. त्यामुळे तो माझ्याशी बोलत नाही.’’

संपादकीय भूमिका

हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर काय आहे ? तो नाकारणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?