(म्हणे) ‘स्वर्गात माझी आवडती फळे उपलब्ध नसल्याने मला नरकात जायचे आहे !’
गीतकार जावेद अख्तर यांचे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे विधान !
मुंबई – स्वर्गात माझी आवडती फळे (उदा. केळ) उपलब्ध नाहीत; म्हणून मला नरकात जायचे आहे, असे विधान गीतकार जावेद अख्तर यांनी केले. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ जानेवारी या दिवशी जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या ‘जादूनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना एका पत्रकाराने त्यांना ‘तुमचे देवाशी नेमके भांडण का आहे ? यामागे कारण काय ?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
संपादकीय भूमिकास्वर्ग आणि नरक यांच्याविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना बेताल विधाने करणारे जावेद अख्तर ! |