राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

लक्षद्वीप – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार महंमद फैजल यांना वर्ष २००९ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लक्षद्वीपच्या करवत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. फैजल हे वर्ष २०१४ पासून संसदेत या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

१. या प्रकरणात एकूण २३ आरोपी होते. त्यांपैकी ४ आरोपींना शिक्षा झाली. फैजल यांना त्यांचे नातेवाईक महंमद सलीह यांच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. दोषींना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फैजल म्हणाले की, हे राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण आहे आणि ते लवकरच वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहेत.

२. लीह यांच्यावर ज्यांनी आक्रमण केले, त्यांचे फैजल यांनी नेतृत्व केले होते. एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर हे आक्रमण करण्यात आले. सलीह हे गंभीररित्या घायाळ झाल्याने त्यांना केरळला नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर अनेक मास रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

असे गुन्हेगारी वृत्तीचे लोकप्रतिनिधी असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीच घातली पाहिजे !