वहिनीवर बलात्कार करण्यास विरोध केल्याने अल्ताफ अहमदकडून तिची गळा दाबून हत्या !
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कदलबल पंपोर येथून नाते संबंधांना लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. येथील ४० वर्षीय अल्ताफ अहमद गनी याने सख्या वहिनीला घरात एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने जोरदार विरोध केल्याने गनीने तिची गळा दाबून हत्या केली.
बलात्कार का किया विरोध… जिहादी ने भाभी को उतारा मौत के घाट…. कहा- घर में अकेली थी, पूरा फायदा उठाना चाहता था@JmuKmrPolice https://t.co/a03FG1KlJB
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) January 11, 2023
१. पीडित महिलेची मुलगी सायंकाळी ५ वाजता घरी परतली असता तिने आईला बेशुद्धावस्थेत पाहिले. तिने शेजार्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडित महिलेला पंपोरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
२. पोलीस अन्वेषणाच्या वेळी मृत महिलेच्या पतीसह कुटुंबियांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. कुटुंबियांनी मृत महिलेच्या दिरावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी दीर अल्ताफ अहमद गनी याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना फाशीची शिक्षा करा ! |