हिंदु राष्ट्र सेनेने श्री सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेतील ‘क्रॉस’ हे ख्रिस्ती चिन्ह काढण्यास भाग पाडले !
सोलापूर, ११ जानेवारी (वार्ता.) – येथे श्री सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेची पूर्वसिद्धता चालू असतांना ‘मलेशिया टॉवर’ची प्रतिकृती उभारण्यात येत होती. या प्रतिकृतीवर ‘क्रॉस’ हे ख्रिस्ती चिन्ह लावण्यात आले होते. हिंदूंच्या गड्डा यात्रेत हा प्रकार होत असल्याचे हिंदु राष्ट्र सेनेच्या लक्षात येताच सेनेच्या पदाधिकार्यांनी संबंधित व्यवस्थापनाला क्रॉसचे चिन्ह काढण्यास भाग पाडले. ‘यापुढे हिंदूंच्या धार्मिक स्थळी असे काही केल्यास हिंदु राष्ट्र सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेचे शहरप्रमुख रवी गोणे यांनी दिली. हिंदूंच्या या चेतावणीनंतर संबंधित व्यवस्थापनाने त्वरित ‘क्रॉस’चे चिन्ह हटवले आहे. (हिंदूंच्या यात्रेतील अन्य पंथियांच्या चिन्हाचा शिरकाव रोखणार्या हिंदु राष्ट्र सेनेचे अभिनंदन ! अशी सतर्कता सर्वत्रच्या हिंदूंनी बाळगल्यास धर्मांतराचे प्रकार रोखण्यास निश्चितच साहाय्य होईल. यासमवेतच यात्रेच्या व्यवस्थापकांनीही अन्य पंथातील प्रतिके वापरली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या यात्रांमध्ये हिंदूंचे धार्मिक चिन्ह न लावता ख्रिस्ती चिन्ह लावले जाणे, हा धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम ! |