मानवरूपी कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी प्रभावी लस (कायदा) आणि राजकीय इच्छाशक्ती यांची नितांत आवश्यकता !
‘मी ‘यू ट्यूब’वर ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांचे ‘प्रतिपक्ष’ आणि अन्य काही पत्रकारांचे ‘धक्केबुक्के’ या शीर्षकाखाली असलेल्या अभ्यासपूर्ण ध्वनीचित्रफिती पहात असतो. या ध्वनीचित्रफितींमधील पत्रकारांचे विचार अत्यंत अभ्यासपूर्ण, वस्तूनिष्ठ, परखड आणि विचार करावयास लावणारे असतात. बर्याच वेळा यामध्ये कथित ‘लिब्रांड’ (साम्यवादी) आणि तथाकथित पुरोगामी मंडळींवर संयत टीका केल्याचे आढळून येते, अर्थात् ते अत्यंत आवश्यकही आहे; परंतु तरीही या निर्लज्ज लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ते निर्लज्जपणे स्वतःचे कुकर्म सातत्याने करण्यातच धन्यता मानतात आणि ते दुसर्याला दुःख देऊन सुखी असतात.
१. कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी यांचे विचार वैचारिक प्रदूषण करणारे
या कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी यांचे विचार हे धोकादायक असे वैचारिक प्रदूषण आहे की, जे अन्य प्रदूषणापेक्षा किंबहुना कोरोेनासारख्या जागतिक महामारीच्या विषाणूपेक्षाही धोकादायक आहे. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, पिसाळलेला कुत्रा चावल्यावर ज्याला ‘हायड्रोफोबिया’ नावाचा रोग होतो, तो माणूस नंतर पिसाळलेल्या कुत्र्यासारखाच सर्वांना चावू लागतो. त्यामुळे त्याला नाईलाजास्तव आणि मृत्यूच्या भयास्तव बंद खोलीत कुलूप लावून ठेवावे लागते. अद्याप या ‘हायड्रोफोबिया’ नावाच्या रोगावर जगात कुठेही उपाय सापडलेला नाही. त्यामुळे ‘हायड्रोफोबिया’ झालेल्या रुग्णाला आणि जनतेला मृत्यूपासून वाचवण्यासाठी आणि पिसाळलेल्या कुत्र्याला दूर करण्यासाठी कठोर अन् कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागतो.
२. देशाच्या आरोग्यासाठी कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी यांच्यावर कठोर उपाययोजना हवी !
यामध्ये आणखी एक महत्त्वाचे सूत्र असे की, पिसाळलेला कुत्रा किंवा ‘हायड्रोफोबिया’ झालेला माणूस हा द्वेषामुळे किंवा दुष्ट भावनेने कुणाला चावत नाही; पण हे कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी द्वेष, दुष्ट भावनेने आणि बुद्धीपुरस्सर हेतूने समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करण्यासह विष कालवत असतात. यामध्ये त्यांचा केवळ स्वार्थ असतो आणि तो स्वार्थ साधण्यासाठी ते देव, देश आणि धर्म किंबहुना स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांनाही बाजूला करण्यास मागे-पुढे पहात नाहीत. ते पिसाळलेला कुत्रा आणि ‘हायड्रोफोबिया’ झालेला रुग्ण यांपेक्षाही कितीतरी घातक आहेत. त्यामुळे अशांवर अधिक परिणामकारक आणि कठोर उपाययोजना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हा मानवी कोरोना नष्ट करण्यासाठी प्रभावी लस (कायदा) आणि राजकीय इच्छाशक्ती यांची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्र-धर्मप्रेमी पत्रकारांनी एकत्र येऊन सरकारला यासंबंधीचा कायदा करण्यास भाग पाडावे, असे वाटते.
अशी प्रभावी लस (कायदा) निर्माण झाली आणि त्याची परिणामकारक कार्यवाही झाली की, समाजाचे आणि पर्यायाने देशाचे आरोग्य अन् स्वास्थ्य चांगले राहील.’
– श्री. द. र. पटवर्धन, कुडाळ, सिंधुदुर्ग. (३०.११.२०२२)