कानपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ९ दिवसांत १३० जणांचा मृत्यू !
थंडीचा परिणाम असल्याचे तज्ञांचे मत !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे गेल्या ९ दिवसांत १३० जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. येथे प्रतिदिन १ ते दीड सहस्र रुग्ण रुग्णालयांत येत आहेत. त्यामुळे रुग्णालये भरली असून तेथे बसायलाही जागा नाही. लक्ष्मणपुरी येथील के.जी.एम्.यू.च्या कार्डियोलॉजीचे प्राध्यापक डॉ. अक्षय प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, थंडीच्या दिवसांतील हृदयविकाराचा धोका वृद्धांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. अनेक अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्याने लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे.
कानपुर: हार्ट अटैक से हो रही मौतों के बीच KGMU में कार्डियालॉजी विभाग के प्रोफेसर डॉ. अक्षय प्रधान ने यूपी तक से खास बातचीत की है। तस्वीरों के जरिए पढ़िए उन्होंने क्या-क्या कहा है।#Kanpur #UttarPradesh #ColdWave https://t.co/mXbIUL3pCd
— UP Tak (@UPTakOfficial) January 11, 2023
अलीकडे कोणत्याही वयात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे थंडीत आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.
कानपूरमधील एल्.पी.एस्. हृदयरोग केंद्राचे संचालक डॉ. विनय कृष्ण यांनी सांगितले की, रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
प्रदेश में ठंड बढ़ने के साथ हार्ट अटैक से होने वाली मौतों का आंकड़ा भी अचानक से बढ़ गया है। इसी मुद्दे पर यूपी Tak ने KGMU के कार्डियोलॉजी के प्रोफेसर डॉ. अक्षय प्रधान से बात कर जाना इन मौतों का कारण।#HeartAttack #ColdWave । @iSamarthS
पूरा वीडियो: https://t.co/44cI34YWGk pic.twitter.com/zOzJr6fUsR
— UP Tak (@UPTakOfficial) January 11, 2023
मागच्या वर्षीच्या तुलनेने आकडा वाढला आहे. या आकड्याने सगळेच हैराण आहेत. आतापर्यंत कधी एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनानंतरचा प्रभाव आणि सर्दी यांचे घातक मिश्रण बनत आहे.