बक्सर (बिहार) येथील औष्णिक वीज प्रकल्पाचा विरोध करणार्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अमानुष मारहाण !
संतप्त ग्रामस्थांकडून पोलिसांवर काठ्या आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण
बक्सर (बिहार) – येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूमी संपादनाला विरोध करतांना ग्रामस्थांनी पोलीस आणि येथील वीज केंद्र यांवर काठ्या आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण केले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारात ४ पोलीस घायाळ झाले. सध्या येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बिहार के बक्सर जिले में थर्मल पावर प्लांट का मामला
जमीन अधिग्रहण के मुआवजे की मांग करने पर घरों में घुसकर बिहार पुलिस किसानों को बुरी तरह पीटा#BiharNews #socialmedia #viral2023 #thermalpowerplants @bihar_police @NitishKumar pic.twitter.com/uPhCPYOMe1— Dainik Bhaskar UP/UK (@dbupuk) January 11, 2023
गेल्या ८५ दिवसांपासून ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. १० जानेवारीला ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्या वेळी पोलिसांनी काहीही केले नाही; मात्र रात्री पोलिसांनी ग्रामस्थांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली, तसेच ४ जणांना अटक केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुसर्या दिवशी पोलिसांवर आक्रमण केले.
लाठीचार्ज से भड़के किसान, बिहार के बक्सर जिले में किसानों ने पुलिस की गाड़ियों को फूंका.https://t.co/nN4dRGZJW2#Bihar #Buxar
— Jan Ki Baat (@jankibaat1) January 11, 2023
संपादकीय भूमिकालोकशाही मार्गाने विरोध करणार्या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |