नाशिक येथे हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ !
पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक – येथील सिडको परिसरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने याविषयी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. येथे पूर्वीही घरांवर दगडफेक करण्यात यायची. लाठ्याकाठ्या घेऊन गल्लीत दहशत निर्माण केली जायची; पण याकडे अंबड पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
संपादकीय भूमिकाजिल्ह्यात निर्माण होणारी अराजकाची स्थिती दूर करण्यासाठी प्रयत्न न करणारे पोलीस काय कामाचे ? |