पुणे शहरात एकाच वेळी ९ ठिकाणी धाड टाकून १० लाखांची ‘ई-सिगारेट’ जप्त !
पुणे – शहरातील शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरामध्ये छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ‘ई-सिगारेट’ची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने लष्कर, कोरेगाव पार्क, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांच्या परिसरात एकाच वेळी ९ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये १० लाख ५२ सहस्र रुपयांच्या ‘ई-सिगारेट’चा साठा जप्त करण्यात आला असून विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.