शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी १४ फेब्रुवारीला !
मुंबई – शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
१. सरन्यायाधीश डी.वाय्. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी चालू आहे.
२. १० जानेवारी या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी मोठ्या खंडपिठापुढे सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधिशांनी शिंदे गटाचे अधिवक्ता हरिश साळवे यांचे मत घेऊन ‘याविषयी १४ फेबु्रवारीला निर्णय होईल’, असे सांगितले.
३. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यास त्यांची आमदारही रहित होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार रहाणार कि पडणार ? हे न्यायालयाच्या निर्णयावर निश्चित होणार आहे.