पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी या दिवशी मुंबईत येणार !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. वांद्रे येथील ‘बीकेसी’ मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक सभा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.