उत्तराखंडमध्ये हिंदु महिला आणि तिच्या ३ अल्पवयीन मुलींचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !
डेहराडून (उत्तराखंड) – येथील हाशिम नावाच्या धर्मांधाने विवाहित हिंदु महिला आणि तिच्या ३ अल्पवयीन मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे. आरोपीने तिन्ही धर्मांतरित मुलींना मदरशात प्रवेशही मिळवून दिला. पोलिसांनी हाशिमच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
Dehradun: Hashim lures a married Hindu woman under the pretext of getting her a job, converts her and her three minor children to Islamhttps://t.co/UmVVVDYDHb
— OpIndia.com (@OpIndia_com) January 10, 2023
१. एका वृत्तानुसार, डेहराडूनच्या नेहरू कॉलनीत रहाणार्या पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ वर्षांपूर्वी तिच्या मुलीचे लग्न डेहराडूनमधील सोनू वर्मा नावाच्या व्यक्तीशी झाले होते. त्यांना तीन मुली झाल्या. त्यानंतर पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात भांडण चालू झाले. यामुळे पीडित महिला तिच्या मुलींसमवेत तिच्या माहेरी राहू लागली.
२. आरोपी हाशिम नेहरू कॉलनीतील तिच्या घरी यायचा. येथे त्याची महिलेशी आणि तिच्या मुलींशी ओळख झाली. काही दिवसांनी हाशिम या हिंदु महिलेला तिच्या ३ मुलींसह घेऊन गेला. हाशिम याने पीडित महिलेला नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
३. आरोपी हाशिम कबाडी याने तिन्ही अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करून त्यांना उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील मदरशात शिकण्यासाठी पाठवले.
४. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य कायदा २०१८’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तेव्हापासून हाशिम कबाडी फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई सरकारने धर्मांधांवर केली पाहिजे ! |