पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १० सहस्र रुपये !
गव्हाचा साठा संपल्याची मंत्र्यांकडूनच घोषणा !
नवी देहली – पाकिस्तानमध्ये महागाईने टोक गाठले आहे. त्यामुळे तेथे अराजकाची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. ‘देशातील गव्हाचा साठा संपला आहे’, अशी घोषणा पाकच्या मंत्र्यानेच केली आहे. खैबर पख्तनूख्वा, सिंध आणि बलूचिस्तान या प्रातांमध्ये गव्हाच्या पिठासाठी हाणामारी होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच यावरून एकाची हत्याही करण्यात आली होती. सिंध प्रांतातील सरकार अल्पदरात पीठ विकत असल्याची माहिती मिळताच तेतील दुकानांवर गर्दी झाली. एका दुकानाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन त्यात ४ जणांचा मृत्यू झाला.
पाकिस्तान में एलपीजी सिलेंडर 10 हजार रुपये! https://t.co/k7AhrgkpO1
— Sach Kahoon (@SACHKAHOON) January 2, 2023
१. पाकच्या रावळपिंडी येथे पिठाची किंमत १५० ते २०० रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. एक डझन अंडी ३३० रुपयांना खरेदी करावी लागत आहेत. कोंबड्यांचे मांस ६५० रुपये किलो, दूध १९० रुपये लिटर, तर तेल ५८० रुपये किलोने विकले जात आहे. १० किलो गव्हाच्या पिठाची पिशवी १ सहस्र ६०० रुपयांना विकली जात आहे.
Pakistan Wheat Crisis: पाकिस्तान में गेहूं के संकट से लोग परेशान, आटे के लिए मारामारी के बीच मची भगदड़ (Watch Video) https://t.co/uNoYzL6FWm #HindiNews #PakistanwheatCrisis #FlourCrisis
— लेटेस्टली हिंदी (@LatestlyHindi) January 10, 2023
२. पाकमध्ये लोक गॅस सिलिंडरऐवजी प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्यांमध्ये गॅस भरून त्याचा वापर केला जात आहे. येथे एका गॅस सिलिंडरची किंमत १० सहस्र रुपये इतकी झाली आहे. त्यामुळेच ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गॅस भरून नेत आहेत.
३. पाकची ही स्थिती त्यांच्या शासनकर्त्यांमुळे आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांची नीती याला उत्तरदायी आहे. पाकिस्तान विकासावर ४ सहस्र ३०० कोटी रुपये आणि कृषी क्षेत्रावर १ सहस्र ८०० रुपये खर्च करतो, तर संरक्षणावर १८ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करतो. यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
४. पाकच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अल्प पैसे राहिले आहेत. पाक सरकारकडे सरकारी कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत.