कानपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीवर आम्लद्वारे (अ‍ॅसिडद्वारे) आक्रमण करण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी !

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

(प्रतिकात्मक चित्र)

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे अनस नावाच्या धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी बलपूर्वक विवाह करण्याची धमकी दिली आहे. अनस याने महाविद्यालयात घुसून सर्वांसमोर हिंदु विद्यार्थिनीचा अवमान केला. विद्यार्थिनीने  विरोध केल्यावर त्याने विद्यार्थिनीला आम्लद्वारे (अ‍ॅसिडद्वारे) आंघोळ घालण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कानपूरच्या अतिरिक्त पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, आरोपी या विद्यार्थिनीला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. याविरोधात पीडितेने ८ जानेवारी २०२३ या दिवशी नौबस्ता पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली.

एका वृत्तानुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी २ वर्षांपूर्वी अनसच्या विरोधात विनयभंगाची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर अनस याने कायद्याला न जुमानता मुलीचा पुन्हा विनयभंग केला, तसेच तिच्या ‘वडिलांना तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलीचा शिरच्छेद करीन’, अशी धमकी दिली होती.

संपादकीय भूमिका 

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !
  • याविषयी निधर्मीवादी, पुरोगामी, महिला आयोग आदी गप्प का ?