पाकिस्तानी मौलवींचा फतवा- (म्हणे) ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला !’
‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणांनंतर पाकिस्तानी मौलवींचा फतवा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील प्रसिद्ध मौलवींनी (मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता) आतंकवादाच्या विरोधात १४ पानांचा फतवा काढत आतंकवादाची निंदा करत ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला आहे’, असे म्हटले आहे. हा फतवा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेकडून पाकच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये सुरक्षादलांवर आक्रमण अधिक तीव्र करण्यात आल्यानंतर काढण्यात आला आहे.
Clerics in #Pakistan have issued a fatwa denouncing terrorism and related activities.https://t.co/vga0wMrosh
— IndiaToday (@IndiaToday) January 10, 2023
पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दारुल उलूम पेशावर आणि जामिया दारुल उलूम हक्कानिया यांसह अनेक मदरशांशी संबंधित मौलवींनी फतवा काढला आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील पोलीस आणि सैन्य यांच्या विरोधात कुणीही शस्त्र हातात घेणे, हे शरीयत कायद्याच्या आणि देशाच्या विरोधात आहे. जो कुणी पाकच्या राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात बंड करेल, त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.
Clerics stress that only head of Islamic state can declare jihad, no one else
Read more: https://t.co/iw8UUTkMQT#GeoNews
— Geo English (@geonews_english) January 9, 2023
प्रत्येकाला ‘जिहाद’ (पवित्र युद्ध) घोषित करण्याचा अधिकार नाही. हा विशेषाधिकार केवळ इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला आहे.
संपादकीय भूमिका
|