पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांच्या षट्चक्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला सकारात्मक परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘संगीत ही ईश्वराने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मानवाला होणार्या विविध व्याधींवर उपाय करण्याचे सामर्थ्य आहे. सध्या समाजात याविषयी पुष्कळ संशोधन चालू आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत विभागाला भेट दिली. ‘विशिष्ट चक्राशी संबंधित व्याधी असलेल्या व्यक्तीला त्या चक्राशी संबंधित राग ऐकवल्यास तिच्या चक्रांवर, तसेच तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी १२ ते १५.४.२०२२ या कालावधीत काही संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांत पू. किरण फाटक यांनी षट्चक्रांशी संबंधित व्याधी निवारणार्थ त्या त्या चक्राशी संबंधित स्वर असलेले प्रधान राग निवडून त्यांचे गायन केले. या संदर्भातील संशोधन पुढे दिले आहे.
पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांच्या षट्चक्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला सकारात्मक परिणाम
‘संगीत ही ईश्वराने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मानवाला होणार्या विविध व्याधींवर उपाय करण्याचे सामर्थ्य आहे. सध्या समाजात याविषयी पुष्कळ संशोधन चालू आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत विभागाला भेट दिली. ‘विशिष्ट चक्राशी संबंधित व्याधी असलेल्या व्यक्तीला त्या चक्राशी संबंधित राग ऐकवल्यास तिच्या चक्रांवर, तसेच तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी १२ ते १५.४.२०२२ या कालावधीत काही संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांत पू. किरण फाटक यांनी षट्चक्रांशी संबंधित व्याधी निवारणार्थ त्या त्या चक्रांशी संबंधित स्वर असलेले प्रधान राग निवडून त्यांचे गायन केले. या संदर्भातील संशोधन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन : या प्रयोगांत त्या त्या चक्रांशी संबंधित व्याधी असलेल्या साधकांना पू. किरण फाटक यांचे शास्त्रीय गायन ऐकवण्यात आले. प्रत्येक प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर साधकांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे पुढीलप्रमाणे चाचण्या करण्यात आल्या.
अ. साधकांच्या षट्चक्रांची स्थिती अभ्यासणे : यासाठी षट्चक्रांचे नमुने वापरून साधकांच्या चाचण्या करण्यात आल्या. षट्चक्रांचे नमुने वापरून व्यक्तीचे परीक्षण करतांना ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा उघडणे, म्हणजे तिच्या त्या त्या चक्राभोवती त्रासदायक स्पंदनांचे आवरण असणे. ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजा न उघडणे, म्हणजे तिच्या त्या त्या चक्राभोवती त्रासदायक स्पंदनांचे आवरण नसणे.
आ. साधकांच्या सूक्ष्म-ऊर्जेची स्थिती अभ्यासणे : यासाठी ‘नकारात्मक’ अन् ‘सकारात्मक’ ऊर्जांचे नमुने वापरून साधकांच्या चाचण्या करण्यात आल्या.
या चाचण्यांतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.
२. साधकांच्या षट्चक्रांची निरीक्षणे
२ अ. पू. किरण फाटक यांचे शास्त्रीय गायन ऐकल्याने साधकांच्या चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प होणे : प्रयोगापूर्वी साधकांच्या चक्रांवर अल्प-अधिक प्रमाणात त्रासदायक स्पंदनांचे आवरण होते. विशेष म्हणजे साधकांना ज्या चक्रांशी संबंधित व्याधी आहेत, त्यांच्या नेमक्या त्याच चक्रांवर सर्वाधिक प्रमाणात त्रासदायक स्पंदनांचे आवरण असल्याचे दिसून आले. (वरील सारणीत अधोरेखित केलेले आकडे पहावेत.) प्रयोगानंतर साधकांच्या चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प झाले. विशेष म्हणजे त्यांच्या व्याधींशी संबंधित चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण सर्वाधिक प्रमाणात अल्प झाले.
२ आ. प्रयोगानंतर साधकांच्या काही चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण वाढण्याचे कारण : प्रयोगानंतर पुढील साधकांच्या काही चक्रांवरील आवरण काही प्रमाणात वाढल्याचे आढळून आले.
१. सौ. संगीता आणि श्रीमती विमल यांच्या तीन चक्रांवरील आवरण वाढले.
२. सौ. सुप्रिया यांच्या दोन चक्रांवरील आवरण वाढले.
३. उर्वरित साधकांच्या एका चक्रावरील आवरण वाढले.
जेव्हा व्यक्तीला सात्त्विक संवेदना दिली जाते, तेव्हा अनिष्ट शक्तींनी तिच्या देहात निर्माण केलेल्या स्थानातील त्रासदायक शक्ती अल्प होऊ लागते. काही वेळी अनिष्ट शक्तीला चैतन्य सहन न झाल्याने ती तिचे स्थान पालटते. त्यामुळे त्या स्थानाशी संबंधित चक्रावर तात्कालिक आवरण येऊ शकते किंवा त्या चक्रावर आधीपासून आवरण असेल, तर त्यात वाढ होऊ शकते. या प्रयोगांतील गायक संत पातळीचे असल्याने त्यांच्या वाणीतून प्रक्षेपित झालेल्या उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदनांमुळे (चैतन्यामुळे) साधकांच्या चक्रांवरील त्रासदायक आवरण लक्षणीयत्यिा घटल्याचे चाचण्यांतून दिसून आले. काही चक्रांवरील आवरण थोडे वाढल्याचे दिसत असले, तरी हा तात्कालिक परिणाम आहे. एकूण परिणाम हा सकारात्मकच झाला आहे, हे पुढे दिलेल्या सूत्रांतून लक्षात येईल.
३. पू. किरण फाटक यांचे शास्त्रीय गायन ऐकल्याने साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढणे : प्रयोगापूर्वी साधकांमध्ये सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा होत्या. प्रयोगानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
३ अ. साधकांच्या सूक्ष्म-ऊर्जेची निरीक्षणे
४. पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांवर पुष्कळ प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे : शास्त्रीय संगीत मुळातच सात्त्विक आहे. पू. किरण फाटक हे संत असल्याने त्यांच्या वाणीत पुष्कळ चैतन्य आहे. संतांनी गायलेल्या शास्त्रीय संगीतातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे साधकांच्या चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ प्रमाणात अल्प झाले. चक्रांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प झाल्याने त्या त्या चक्रांचे कार्य सुधारते. त्यामुळे व्यक्तीला असलेल्या व्याधींची तीव्रता अल्प होते. साधकांना संतांकडून चैतन्य मिळाल्याने त्यांच्यातील त्रासदायक स्पंदने अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. थोडक्यात पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांच्या सप्तचक्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.११.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com