जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा
सातारा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी !
सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – झारखंड राज्यातील भिरडी जिल्ह्यातील जैन पंथियांचे सर्वाेच्च तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य भंग होऊन तिथे मद्य आणि मांस यांचा यथेच्छ बाजार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करा, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे कार्यकारिणी सदस्य तथा सातारा जिल्हा हिंदु महासभेचे कोषाध्यक्ष उमेशजी गांधी यांनी केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील राजवाडा, गोलबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये ते बोलत होते. या वेळी नाथ पंथीय पू. सोमनाथगिरिजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, हिंदु महासभेचे रमेश ओसवाल, अधिवक्ता धनंजय चव्हाण, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम, समितीचे हेमंत सोनवणे, अनिकेत कदम उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही ‘लव्ह, लँड, हलाल जिहाद’, ‘गड-दुर्गांवरील मुसलमानांचे अतिक्रमण’, ‘पाकमधील हिंदूंच्या हत्या’, आदी विषयांवर संबोधित केले.
#sataracity
#halal
हिंदु राष्ट्र -जागृती आंदोलन
स्थळ :- गोलबाग, राजवाडा, सातारा
दिनांक :- रविवार, ०८ जानेवारी २०२३
पहा आणि इतरांनाही पहायला द्या🙏
उमेश गांधी पुढे म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. याला संपूर्ण भारतामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.