भारतातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्वल !
|
मुंबई – अमेरिकेतील ‘युनायटेड नेशन्स फूड अँड अर्गनायझेशन’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये जगातील १२० देश सहभागी झाले होते. एका वर्षात किती झाडे लावली ?, ३ वर्षांत लावलेल्या झाडांची सद्य:स्थिती, नागरिकांचा सहभाग, पालिका अधिकारी आणि संस्था यांचा सहभाग सर्वेक्षणात पडताळण्यात आला. शहरात असलेल्या चिमण्यांची संख्या, बायोडायव्हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे अव्वल ठरली.
मुंबईतील जंगले आणि वृक्षारोपण झालेली ३ लाखांहून अधिक झाडे ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. तसेच भाग्यनगर येथील हिरवाईही आकर्षक ठरली. ऑर्गनायझेशनच्या नियमावलीतील नियमांची पूर्तता करत मुंबईने ‘ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कार मिळवला.