सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्या छायाचित्रांच्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१७.९.२०२१ म्हणजेच ‘वामन जयंती’ या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस झाला. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पू. वामन नामजप करतांना आणि पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा’ अशी २ छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ‘त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करून काही अनुभूती आल्यास त्या लिहून पाठवण्यास सांगण्यात आले होते. त्या छायाचित्रांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. वामन राजंदेकर यांचे ध्यान करत असलेले छायाचित्र
१ अ. जाणवलेली सूत्रे
१ अ १. विविध अनुभूती : ‘मला या छायाचित्राकडे पाहून त्यांच्यातील निरागसता, भाव आणि प्रीती जाणवली. ‘त्यांच्या हातातून पांढरा प्रकाश येत आहे. त्यांच्या चरणांतून प्रचंड शक्ती प्रक्षेपित होत आहे आणि त्यांच्या छायाचित्रातून चंदनाचा सुगंध येत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
१ अ २. ‘पू. वामन राजंदेकर यांचा तोंडवळा आणि चरण यांतून मला चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवले.’
– सौ. सुचेता वर्दे, दत्तनगर, कुडाळ (२३.१०.२०२१)
१ अ ३. ‘मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होत असून नाकाद्वारे चैतन्य शरिरात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. या सूत्राचे टंकलेखन करतांनाही मला चैतन्याच्या लहरी जाणवल्या.’
– सौ. शीतल जोशी, गावभाग, सांगली. (२१.९.२०२१)
१ अ ४. ‘पू. वामन तपश्चर्येला बसलेले ध्यानस्थ ऋषि आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या चेहर्यावर प्रगल्भता जाणवली.’
– सौ. वैशाली देसाई, सनातन आश्रम, गोवा.
१ अ ५. ‘पू. वामन यांची मुद्रा पाहून ‘ते पूर्वजन्मीचे महान तपस्वी, ऋषि असून ध्यान आणि साधना करत आहेत’, असे मला जाणवले.’
– कु. अनुष्का घाडगे (वय २१ वर्षे), कात्रज, पुणे. (२८.९.२०२१)
१ अ ६. ‘पू. वामन अंतर्मुख, शांत आणि समाधानी आहेत’, असे वाटले, तसेच ‘पू. वामन समाधी अवस्थेत आहेत’, असे मला जाणवले.’
– कु. आकांक्षा ज्ञानेश्वर घाडगे (वय २१ वर्षे), कात्रज, सातारा रस्ता, पुणे. (२८.९.२०२१)
१ अ ७. ‘पू. वामन सर्व साधकांचे त्रास दूर करण्यासाठी श्रीविष्णूला आळवत आहेत’, असे मला जाणवले.’
– सौ. सुजाता रेणके, सनातन आश्रम, गोवा. (१८.९.२०२१)
१ आ. त्रासदायक अनुभूती
१. ‘पू. वामन यांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर माझ्या हाताची बोटे दुखू लागली आणि त्यानंतर माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या.’
– सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, गोवा. (१७.९.२०२१)
१ इ. चांगल्या अनुभूती
१ इ १. चैतन्य मिळणे
अ. ‘पू. वामन राजंदेकर यांचे छायाचित्र पहातांना त्यातील चैतन्यामुळे माझे डोळे बंद झाले आणि बराच वेळ मला डोळे उघडता येत नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. वामन यांना शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर पू. वामन यांच्या छायाचित्रातील चैतन्य मला सहन करता आले आणि माझा आध्यात्मिक त्रास उणावला.’
– सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
आ. ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले आणि त्यांची ध्यानावस्था पाहून माझेही ध्यान लागल्यासारखे झाले.’
– श्रीमती कुसुम घाडगे, कात्रज, पुणे. (२८.९.२०२१)
इ. ‘पू. वामन राजंदेकर यांंची ध्यानमुद्रा पाहून माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार नाहीसे झाले आणि मला उत्साह जाणवला.’
– सौ. सुजाता रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२१)
१ इ २. नामजप चालू होणे
अ. ‘पू. वामन यांच्या ठिकाणी ऋषि बसलेले असून तेच नामजप करत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या भावमुद्रेकडे पाहून माझा भाव जागृत झाला आणि आपोआपच मनातून ‘परम पूज्य गुरुदेव, परम पूज्य गुरुदेव’, असा नामजप चालू झाला.’
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
१ इ ३. आनंद आणि शांती जाणवणे : ‘पू. वामन राजंदेकर यांचे छायाचित्र पाहून मला आनंद आणि शांती जाणवली.’
– सौ. सुचेता वर्दे, दत्तनगर, कुडाळ (२३.१०.२०२१)
१ इ ४. संतांचे स्मरण आणि देवाचे दर्शन होणे
अ. ‘पू. वामन यांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र बघून मला संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आठवण झाली.’
– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज (१८.९.२०२१)
आ. ‘पू. वामन राजंदेकर यांची नामजप करतांनाची भावमुद्रा पाहिल्यावर ‘तेथे बालगणेश बसला आहे. तो आपत्काळात साधकांच्या रक्षणार्थ ध्यान करत आहे’, असे क्षणभर वाटून त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव दाटून आला.’
– सौ. मंजिरी बेडेकर, जिल्हा रत्नागिरी
इ. ‘मला बालकृष्णाचे नटखट दर्शन झाले. मला त्यांच्या छातीत ‘ॐ’ दिसला.’
– सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
१ इ ६. मारक रूप जाणवणे
अ. ‘पू. वामन ध्यानावस्थेत साधकांसाठी नामजप करत असून वातावरणातील अनिष्ट शक्तींशी युद्ध करत आहेत’, असे जाणवले.’
– श्रीमती मधुरा तोफखाने, गावभाग, सांगली. (१७.९.२०२१)
(क्रमशः)
|