छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते ?

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हटल्‍याचे प्रकरण

नुकतेच महाराष्‍ट्र विधीमंडळाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ नव्‍हते’, असे म्‍हटले. या वक्‍तव्‍याचे विविध इतिहासकार, तज्ञ, हिंदुत्‍वनिष्‍ठ यांच्‍याकडून खंडण करण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ होते’, याविषयीचा लेख येथे देत आहोत.

१. शूरवीर पूर्वजांनी परकीय आक्रमकांची पाशवी वृत्ती नष्‍ट करणे

आपल्‍या देशावर सातत्‍याने परकीय आक्रमकांनी राजकीय आणि धार्मिक आक्रमणे केली आहेत. आपल्‍या देशातील हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करण्‍याच्‍या हेतूनेच या परकीय आक्रमकांनी स्‍वतःची अमानुष राजसत्ता प्रस्‍थापित केली. हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना हीन ठरवले. हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना कलंकित करण्‍यासाठी आपले तत्त्वज्ञानही विकृत आणि कलुषित करण्‍याचा प्रयत्न केला.

श्री. दुर्गेश परुळकर

मुळातच सहिष्‍णू असलेल्‍या आणि उदारमतवादी असलेल्‍या आपल्‍या हिंदु संस्‍कृतीने या परकीय आक्रमकांच्‍या कपटी, कावेबाज, दुष्‍ट प्रवृत्तीला वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर विरोध करून ती पालटण्‍याचा वैध मार्ग अवलंबला. प्राचीन काळात हूण, कुशाण, शक या रानटी टोळ्‍यांनी आपल्‍या देशावर आक्रमण करून आपल्‍याला उपद्रव दिला होता. आपल्‍या शूरवीर पूर्वजांनी या सर्वांचा पराभव करून त्‍यांच्‍यातील पाशवी वृत्ती नष्‍ट केली. त्‍यांना आपल्‍या समाजात विलीन केले. त्‍यांच्‍या पूर्वीच्‍या कोणत्‍याही खुणा आता शेष राहिलेल्‍या नाहीत. ही रानटी पाशवी वृत्तीची जात पूर्णपणे हिंदू समाज आणि हिंदु संस्‍कृती यांत विलीन झाली. त्‍यांचे अस्‍तित्‍वही राहिले नाही. याचा अर्थ हिंदु संस्‍कृतीने त्‍यांच्‍यावर संस्‍कार करून त्‍यांच्‍यातील दानवी वृत्ती नष्‍ट केली, ते मानव झाले.

२. ख्रिस्‍ती आणि मुसलमान अनुयायांनी पाशवी वृत्ती चालू ठेवणे

सहस्रो वर्षांपेक्षा अधिक काळ मुसलमान आणि ख्रिस्‍ती हिंदूंच्‍या सहवासात राहिले; पण त्‍यांनी हिंदूंचा एकही गुण घेतला नाही. स्‍वतःची विकृती, क्रौर्य, अमानुषता आणि विकार यांचे उदात्तीकरण केले. हिंदु संस्‍कृतीला विकृत ठरवले. समाजवादाचा पुरस्‍कार करणार्‍यांनी त्‍याला हातभार लावला. ख्रिस्‍ती आणि मुसलमान या धर्मांच्‍या अनुयायांनी स्‍वतःची पाशवी वृत्ती जतन करण्‍याचा स्‍वतःचा दुराग्रह तसाच चालू ठेवला. अशा लोकांशी ज्‍यांना दोन हात करता येत नाहीत, अशा मंडळींनी हिंदु संस्‍कृतीला कलंकित करण्‍याचे काम केले. ते त्‍यांच्‍यासाठी अत्‍यंत सोपे होते. हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांचा पाया सहिष्‍णुतेचा असल्‍यामुळे क्रौर्याच्‍या पायावर उभ्‍या असलेल्‍या ख्रिस्‍ती आणि मुसलमान धर्मियांच्‍या पायावर लोटांगण घालणे, हाच पुरुषार्थ म्‍हणून गौरवला गेला.

३. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा केलेला अतोनात छळ

आजही आपल्‍याच देशातील औरंगजेबासारख्‍या अत्‍यंत क्रूर आणि विध्‍वंसक वृत्तीच्‍या बादशाहचे पोवाडे गाणारे त्‍याचे भाट राजकीय नेत्‍यांच्‍या रूपात वावरत आहेत. याच औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडली. त्‍याने तशा आज्ञा आपल्‍या सैनिकांना दिल्‍या. छत्रपती संभाजी महाराजांचे अत्‍यंत हाल करून त्‍यांना ठार मारले. एवढेच नाही, तर संभाजी महाराजांचा मित्र कवी कलश याची जीभ छाटण्‍यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे फोडण्‍यात आले. शंभूराजांना इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार करण्‍यास सांगण्‍यात आले. ‘त्‍यांनी इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार केला, तर त्‍यांनी केलेल्‍या सर्व अपराधांची क्षमा करण्‍यात येईल’, असेही सांगण्‍यात आले. छत्रपती संभाजी महाराजांनी इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार केला नाही. याचा औरंगजेबाला संताप आला आणि त्‍याने संभाजी महाराजांचे डोळे फोडण्‍याची आज्ञा दिली.

४. औरंगजेबाने पराभूत आदिलशाहला दिलेली सन्‍मानजनक वागणूक

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्‍याआधी दक्षिणेतील दोन इस्‍लामी सत्तांना पराभूत केले होते. त्‍या दोन इस्‍लामी सत्तांच्‍या सत्ताधीशांना औरंगजेबाने स्‍वतःच्‍या दरबारात अत्‍यंत सन्‍मानाने वागवले. विजापूरचा किल्ला जिंकल्‍यानंतर आदिलशाहला कैद करून औरंगजेबासमोर उभे करण्‍यात आले. त्‍या वेळी औरंगजेबाने त्‍याला स्‍वतःच्‍या दरबारात आपल्‍या उजव्‍या बाजूला असलेल्‍या आसनावर बसवून त्‍याला मानाची वस्‍त्रे, आभूषणे दिली आणि त्‍याचा सन्‍मान केला. त्‍याचा सन्‍मान करतांना औरंगजेब आदिलशहाला म्‍हणाला, ‘‘परमेश्‍वराची तुझ्‍यावर कृपा राहो. मला शरण येऊन तू शहाण्‍यासारखा वागला आहेस. तू तुझ्‍या हिताची गोष्‍ट केली आहेस. माझ्‍या कृपेने आणि बक्षीसाने तू महान पदाला जाशील. आता मन शांत ठेव.’’

५. छत्रपती संभाजी महाराजांचा सूड घेण्‍यासाठी औरंगजेबाने त्‍यांना ठार मारणे

औरंगजेबाने आदिलशहाचा सन्‍मान केला; कारण आदिलशहा मुसलमान होता. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्‍या दृष्‍टीने काफीरांचे राजे होते. संभाजी राजांनी अनेक मुसलमानांना कंठस्नान घातले होते. इस्‍लामी राज्‍यातील अनेक नगरे छत्रपती संभाजी महाराजांनी उद़्‍ध्‍वस्‍त केली होती. त्‍याचा सूड घेण्‍यासाठी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अतोनात छळ करून त्‍यांना ठार मारले.

६. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारण्‍यामागील मुख्‍य कारण

छत्रपती शिवाजी महाराज आगर्‍याला औरंगजेबाच्‍या कैदेत होते. त्‍या वेळी त्‍याला शिवछत्रपतींना ठार मारायचे होते; पण तो तसे करू शकला नाही. तो त्‍याला त्‍याचा हलगर्जीपणा वाटला. त्‍या एका चुकीमुळे मराठ्यांशी औरंगजेबाला आयुष्‍यभर संघर्ष करावा लागला. त्‍यात त्‍याला यशही आले नाही. याचाच त्‍याला पश्‍चात्ताप होत होता. ‘आता हातात सापडलेल्‍या संभाजी महाराजांना आपण जीवदान दिले, तर या भूमीत इस्‍लामी सत्ता नावालाही उरणार नाही’, अशी भीती औरंगजेबाला होती. याआधी संभाजी महाराजांना ठार मारण्‍याचा त्‍याने दोनदा प्रयत्न केला होता; पण त्‍यात त्‍याला यश प्राप्‍त झाले नव्‍हते. पुन्‍हा हा हिंदू जर आपल्‍या तावडीतून सुटला, तर पश्‍चाताप करण्‍यासाठी आपणही जिवंत रहाणार नाही. हे औरंगजेब ओळखून होता; म्‍हणूनच त्‍याने अत्‍यंत क्रौर्याने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारून टाकले.

७. प्रलोभने दाखवून किंवा बळजोरीने हिंदूंचे धर्मांतर करणे

असे असले, तरी संभाजी महाराजांच्‍या बलीदानानंतर १८ वर्षे औरंगजेब महाराष्‍ट्राची भूमी जिंकण्‍यासाठी लढत राहिला; पण त्‍याला महाराष्‍ट्राची तसूभर भूमी जिंकता आली नाही. धर्मांतर करून हिंदूंचे संख्‍याबळ कमी करण्‍याचा औरंगजेबाने यशस्‍वी प्रयत्न केला. याच औरंगजेबाने प्रलोभने, धाक दाखवून किंवा बळजोरीने अनेकांना मुसलमान केले. एकाने औरंगजेबाच्‍या सरदाराकडून त्‍या काळातील ५०० रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज त्‍याला फेडता आले नाही, म्‍हणून त्‍याला मुसलमान करून घेण्‍यात आले.

१४ ऑगस्‍ट १६८० या दिवशी औरंगजेबाने एक आदेश दिला, ‘‘मौजा यावल या ठिकाणी असलेल्‍या कैद्यांपैकी स्‍त्रिया आणि मुले यांना स्‍वतःजवळ ठेवावे. ३५ पुरुषांना इहतशामखानाच्‍या (कोतवालाच्‍या) हवाली करावे. त्‍याने या सर्वांना मुसलमान करून नमाजपठण शिकवावे.’’ या आदेशावरून त्‍या कोतवालाने सर्वांना मुसलमान केले.

८. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘मक्‍हूर’ (पराभूत असा) करणे

१४ डिसेंबर १६८२ या दिवशी सूरतमधील अधिकारी कारतलबखान याच्‍या पत्रातील हा उतारा पहा…‘संभा मक्‍हूर याच्‍या पंचेचाळीस नोकरांबद्दल हुकूम झाला होता की, जो कुणी मुसलमान होईल त्‍याला कैदेत ठेवावे आणि बाकीच्‍यांना ठार मारावे.’ या आदेशाप्रमाणे जे मुसलमान होण्‍यास सिद्ध होते त्‍यांना मुसलमान केले. इतर १३ जणांना ठार मारले. या उतार्‍यात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘संभा मक्‍हूर’ असा करण्‍यात आला आहे. ‘मक्‍हूर’ हा अरबी शब्‍द असून त्‍याचा अर्थ पराभूत किंवा पराभूत होण्‍यास पात्र असा आहे.

९. औरंगजेबाने काशी विश्‍वनाथासह शेकडो मंदिरे पाडणे आणि गायी कापण्‍याविषयी आदेश देणे

औरंगजेब बादशाह झाल्‍यानंतर त्‍याच्‍या आदेशावरून ‘वर्ष १६६९ मध्‍ये काशी विश्‍वनाथाचे मंदिर पाडण्‍यात आले’, अशी नोंद त्‍याच्‍या दरबाराच्‍या कागदपत्रांत आहे. त्‍या जागेवर मशीद बांधण्‍यात आली. त्‍यानंतर उत्तरेत मराठ्यांचा जेव्‍हा प्रभाव वाढला, त्‍या वेळी पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांनी त्‍या जागेच्‍या शेजारीच पुन्‍हा काशी विश्‍वनाथाचे मंदिर बांधले.

औरंगजेबाने उदयपूर, जोधपूर आणि जयपूर या परिसरामध्‍ये मार्च १६७९ ते ऑगस्‍ट १६८० या कालखंडात वास्‍तव्‍य केले होते. याच काळात त्‍याने हिंदूंची ३०० हून अधिक मंदिरे पाडली. याचा तपशील ‘मआसिर-इ-आलमगिरी’ या ग्रंथात आढळतो. जानेवारी १७०५ मध्‍ये औरंगजेबाचा मुक्‍काम पंढरपूरला होता. त्‍याने तेथील मंदिर पाडण्‍याची आज्ञा केली. त्‍यासह सैन्‍यातील कसायांना तेथील ‘गायी कापा’, अशी आज्ञा केली. त्‍याच्‍या हुकूमाची कार्यवाही करण्‍यात आली, असे त्‍याच्‍या एका कागदपत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

१०. औरंगजेबाची बाजू घेणारे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्‍हाड !

औरंगजेबाच्‍या या अमानुषतेकडे दुर्लक्ष करून औरंगजेबाची बाजू घेणारे महाभाग आपल्‍या महाराष्‍ट्रात आहेत, हेच खरे दुर्दैव ! संपूर्ण जग इस्‍लाममय करण्‍याचे ध्‍येय कुराणाने मुसलमानांना दिले आहे. त्‍याच्‍या पूर्तीसाठी जगातील मुसलमान कार्यरत झाले आहेत. तशा वल्‍गना वारंवार आपल्‍या देशात केल्‍या जात आहेत. याचा अनुभव येत असतांनाही आपल्‍या देशातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍यासारखे नेते राष्‍ट्रहिताचा विचार करून देशात वावरतांना दिसत नाहीत.

११. …तर निधर्मी नेते इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार करतील !

उद्या औरंगजेबाचे वारसदार यांनाही काफीर ठरवणार आहेत. त्‍यांच्‍यासमोर ते दोनच पर्याय ठेवतील, ‘इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार करा किंवा मरा’. त्‍या वेळी ते निश्‍चितच इस्‍लाम धर्माचा स्‍वीकार करतील, याविषयी आमच्‍या मनात शंका नाही. म्‍हणूनच की काय, अजित पवार ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्‍हते’, असे म्‍हणतात आणि जितेंद्र आव्‍हाड औरंगजेबाचे गुणगान करतांना थकत नाहीत. ‘मुसलमानाने हिंदुस्‍थानचे इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर केले, तर त्‍यांचा त्‍याला आक्षेप असणार नाही, हेच त्‍यांनी त्‍यांच्‍या कृतीतून सिद्ध केले आहे’, असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली (२.१.२०२३)

संपादकीय भूमिका

सध्‍या खोटा इतिहास सांगून हिंदूंमध्‍ये दुफळी माजवणार्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्‍यक !