विनाअनुमती ‘फ्लेक्स’वर कारवाई न केल्याने साहाय्यक आयुक्तांना आर्थिक दंडाची शिक्षा !
पुणे – शहरातील फ्लेक्सबाजी थांबावी, याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या परिमंडळ २ मधील ३ साहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावून दंडाची शिक्षा केली आहे. त्यानंतर आता परिमंडळ ४ मधील क्षेत्रीय कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्तांवरही कारवाईचा प्रस्ताव सिद्ध केला असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. शहरात १५ ते १७ जानेवारी या कालावधीत ‘जी २०’ परिषदेच्या बैठका होणार आहेत. या वेळी देश-विदेशातील प्रतिनिधी उपस्थित रहाणार असल्याने शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे.