नाशिक येथे १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत गैरवर्तन करणार्या शिक्षकावर गुन्हा नोंद !
नाशिक – येथील सिडको भागातील पेठे विद्यालयातील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक रवींद्र नाकील यांनी १० वर्षीय विद्यार्थिनीसमवेत शाळेतच गैरवर्तन केले. या प्रकरणी शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडवणार ? |