नंदुरबार येथील दंडपाणेश्वर गणेश मंदिर आणि जैन मंदिर येथे चोरी !
नंदुरबार – शहरातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील २ किलो चांदीचे आभूषण, तसेच ४ दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी पळवली, तर साक्री रोडवरील जैन मंदिरातील दानपेटी फोडून २५ सहस्र रुपये चोरले. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
एका प्रतिष्ठित गणेशभक्त व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वीच चांदीत घडवलेले गणपतीचे कर्ण सोंड आणि गळ्यातील हार दंडपाणेश्वर मंदिर ट्रस्टला दान म्हणून दिले होते. ते सर्व चोरीला गेले. मंदिर परिसरातील ४ दानपेट्यांचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरण्यात आली. या मंदिर परिसरात ८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत; परंतु चोरांनी मंदिर परिसरात प्रवेश करताच आधी डीव्हीआर् (कॅमेरे नियंत्रित करणारे यंत्र) फोडला. नंतर ‘दानपेट्या तोडून नाल्यात फेकल्या’, असे मंदिर विश्वस्तांकडून सांगण्यात आले. याच कालावधीत जैन मंदिरातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. नंदुरबार पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामंदिरात होणार्या चोर्या कायद्याचा धाकच उरला नसल्याचे दर्शवतात ! |