‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावाने सेवा करणार्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर (वय २३ वर्षे) !
पौष कृष्ण तृतीया (१०.१.२०२३) या दिवशी कु. वैष्णवी वेसणेकर यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. वैष्णवी वेसणेकर यांना २३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. मनमोकळेपणा
‘कु. वैष्णवी आधी अबोल होती. आता ती माझ्याशी स्वतःहून बोलते. ती मला तिच्याकडून झालेल्या चुका सांगते. ती मला तिच्या चुका विचारते.
२. स्वतःकडे कर्तेपणा न घेणे
मी तिचे कौतुक केल्यावर ती मला म्हणते, ‘‘अग, परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडून करून घेतात.’’ ती स्वतःकडे कर्तेपणा घेत नाही.
३. भावपूर्ण सेवा करणे
ती भगवंताच्या अखंड स्मरणात असते. तिला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतो; पण ती भावाच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे भक्तीसत्संगाच्या विषयांची सिद्धता करण्याची आणि धर्मप्रेमींसाठी, तसेच आश्रमातील साधकांसाठी भावसत्संग घेण्याची सेवा असते.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी वैष्णवीविषयी काढलेले कौतुकोद़्गार !
वैष्णवीताई भक्तीसत्संगात सांगण्याच्या विषयाचे लिखाण विषयाशी एकरूप होऊन मनापासून आणि भावपूर्ण करते. ताईने केलेली सेवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना पुष्कळ आवडते. त्या आम्हाला नेहमी सांगतात, ‘‘देव मला विचार देतो आणि वैष्णवी त्याचे लिखाण करते. तिचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे !’’ भक्तीसत्संग झाला की, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ वैष्णवीच्या पाठीवरून हात फिरवून तिला शाबासकी देतात. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आशीर्वाद देतात’, असा तिचा भाव असतो.’
५. तिच्या तोंडवळ्यात पालट झाला आहे.’
– कु. अमृता मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |