सोलापूर येथील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी नव्याने पाठवला प्रस्ताव !
सोलापूर – केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने मागील सप्ताहात ‘महात्मा गांधी प्राणी संग्रहालया’ची पडताळणी केली असून असुविधा आणि निकष लागू होत नसल्याने केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची मान्यता रहित केली होती. रहित केलेली मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा चालू आहे. ४७ त्रुटी दूर करून पुन्हा अनुमती मिळावी, यासाठी महापालिकेने नव्याने प्रस्ताव पाठवला आहे.
सोलापूरपासून २५० किलोमीटर परिसरात प्राणी संग्रहालय नाही. विद्यार्थी, नागरिक यांना पर्यटन अभ्यासासाठी एकमेव प्राणी संग्रहालय आहे; मात्र तेही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीचे ठरले. आता केंद्रीय प्राधिकरणाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा नव्याने अनुमती मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.