पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना तळमळीने प्रार्थना करणारी आणि आश्रमात आल्यावर सेवेतून त्यांना अनुभवून आनंद घेणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १८ वर्षे) !
मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०२१ मध्ये झालेल्या ‘युवा साधना शिबिरा’ला आले होते. तेव्हापासून मला आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा होती. देवाने माझी इच्छा पूर्ण केली. पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात येतांना आणि आल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. भाऊ पूर्णवेळ रामनाथी आश्रमात राहून साधना करत असल्यामुळे त्याला साधिकेची पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा समजून घेता येणे
शिबिराला आल्यापासून माझी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्याची पुष्कळ इच्छा होती; पण कौटुंबिक अडचणी आणि माझे आई-वडील साधना करत नसल्यामुळे मला ते शक्य होत नव्हते. माझा दादा (श्री. आकाश श्रीराम) रामनाथी आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करत असल्यामुळे तो माझी पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा समजू शकला. मला त्याचा पाठिंबा मिळत होता.
२. ‘आश्रमात साधनेसाठी येता यावे’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सतत प्रार्थना करणे
मी प्रत्येक कृती करतांना आणि प्रतिदिन महाविद्यालयात जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नियमित प्रार्थना करायचे, ‘मला तुमच्या भुवैकुंठात (रामनाथी आश्रमात) यायचे आहे. ‘हे गुरुदेवा, मला प्रत्येक पाऊल देवाकडे जाता येण्यासाठीच टाकता येऊ दे.’ मी मानसरित्या त्यांना सतत विचारायचे, ‘तुम्ही मला आश्रमात कधी बोलावणार आहात ?
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने भावाने आई-वडिलांना पूर्णवेळ आश्रमात राहून साधना करण्याविषयी समजावून सांगणे
दादा रामनाथी आश्रमात एका सेवेसाठी जाणार होता. दादाने मला विचारले, ‘‘तुला रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करायची आहे का ?’’ मी ‘‘हो’’ म्हणाले. तेव्हा त्यानेे आई-वडिलांना मला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवण्याविषयी समजावून सांगितले. तो आई-वडिलांच्या स्थितीला जाऊन त्यांना तळमळीने समजावून सांगत असे. तेव्हा ‘दादाच्या माध्यमातून परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्यासाठी पुष्कळ करत आहेत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.
४. आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन व्हावे, अशी तीव्र इच्छा होणे; मात्र सूक्ष्मातून त्यांच्या अनुसंधानात रहाता येऊन त्यांची प्रीती अनुभवणे
मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर मला परम पूज्यांचे दर्शन व्हावे, अशी तीव्र इच्छा झाली होती; मात्र नंतर मला सूक्ष्मातून त्यांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. ‘सहसाधक आणि सेवा यांच्या माध्यमातून ते सतत माझ्या समवेत आहेत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळत असे. त्यातून मला त्यांची प्रीती अनुभवता आली.
५. मनुष्यरूपात जन्म घेऊन साधकांना सेवा आणि साधना शिकवून ती करून घेणारे नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेे !
‘या घोर कलियुगात आमच्यासारख्या सर्वसामान्य जिवांना साधनेद्वारे देव प्रसन्न होऊन देवाचे दर्शन होणे, ही फार कठीण गोष्ट आहे; म्हणून साधकांच्या उद्धारासाठी साक्षात् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांना साधना शिकवून आमच्याकडून ती करून घेत आहेत. देवाला विराट आणि अवतारी रूपात पहाण्याइतकी साधकांची क्षमता, पात्रता आणि साधनाही नाही; म्हणूनच गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मनुष्यरूपातून आपल्याला दर्शन देतात आणि घडवतात’, असे मला वाटते.
६. ‘सर्वांतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्व साधकांकडे पूर्ण लक्ष असते’, हे अनुभवता येणे
प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) हे साक्षात् महाविष्णुस्वरूप आहेत. त्यांनी माझ्या मनातील विचार आणि चिंता जाणली. माझी साधना थांबू नये; म्हणून मला त्यांचा सत्संग लाभला. माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट झाले. ‘गुरुदेवांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष असते’, हे मला पुन्हा एकदा अनुभवता आले.
गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– केवळ श्री गुरूंची, कु. सुवर्णा श्रीराम (वय १८ वर्षे), सोलापूर
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |