हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी हाच पर्याय ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती
कोनगाव (भिवंडी) येथे हिंदुत्वाचा हुंकार !
कल्याण, ९ जानेवारी (वार्ता.) – अनेक आक्रमकांच्या सत्तेमुळे काही काळ हिंदुत्वाची विचारधारा दाबली गेली असली, तरी आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी एकमुखाने केली पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. समितीच्या वतीने कल्याणपासून जवळ असलेल्या भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कल्याण आणि भिवंडी भूमीवर मोठ्या प्रमाणात अन्य पंथियांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. धर्मांधांची दहशत, लव्ह जिहाद, लँड जिहाद, तसेच गडदुर्गांवरील अतिक्रमण यांमुळे सर्वसामान्य हिंदू त्रस्त झाला आहे. या विरोधात सनदशीर मार्गाने आपले पद, पक्ष, संप्रदाय हे बाजूला ठेवून कल्याण आणि भिवंडी नगरी ‘हिंदु राष्ट्र नगरी’ करण्याचा निर्धार कोनगाव येथील ग्रामस्थांनी केला.
सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. उपस्थित संत, वक्ते आणि मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे श्री. सुनील कदम यांनी सांगितले. या सभेस हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजातील विविध मान्यवर यांच्यासह ३०० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
प्रत्येक हिंदूने धर्मशास्त्र समजावून घेऊन धर्माचरण करायला प्राधान्य दिले, तर हिंदु राष्ट्राची पहाट उजाडायला वेळ लागणार नाही, असे उद़्गार सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी काढले.
मान्यवरांची उपस्थिती : सभेला कोनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती रेखा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य सविता किणी, मधु म्हात्रे, रजनी नाईक, रेखा मुकादम, अनिकेत म्हात्रे, प्रदोष म्हात्रे, दीपक मुकादम, माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय म्हात्रे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कविता भगत, शिवचेरोबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू म्हात्रे, तसेच पदाधिकारी, श्रीराम हिंदु संघटनेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल-हिंदु, नवदुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू किणी तसेच कपील नाईक, कमलाकर नाईक, विश्व हिंदु महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बजरंग कुरील, विश्व हिंदु महासंघाचे अनिल चौहान, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सोनार, वाहतूक आघाडी अध्यक्ष संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदूंवर होणार्या आघातांविषयी परखडपणे विचार मांडणार्या दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार व्हा ! – प्रसाद वडके
हिंदू धर्मियांवर होणार्या आघातांविषयी परखडपणे विचार मांडणारे दैनिक म्हणून ‘सनातन प्रभात’ची ओळख आहे. हे आघात रोखण्यासाठी काय कृती करायला हवी, हे जाणून घेण्यासाठी आजच दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार व्हा !
आढावा बैठक !स्थळ – आरोग्य केंद्राजवळील हनुमान मंदिर, कोनगाव, दिनांक – १० जानेवारी २०२३ वेळ – रात्री ८ |