भक्ती असो वा ज्ञान, ईश्वर असे अधिष्ठान
॥ श्रीकृष्णाय नम: ॥
ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासामुळे भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा भार ईश्वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्य आपला आत्मा हा ज्ञानमय चैतन्यरूपी ईश्वराचाच अंश आहे हे जाणून आत्मबळाने आध्यात्मिक प्रगती करतो.
दोघेही ईश्वराच्या आधारावरच प्रगती करतात.
– अनंत आठवले. १९.०९.२०२२