धुळे येथे मद्यधुंद टँकरचालकाने अनेक वाहनांना उडवले !
धुळे – शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी ९ ते १० या वेळेत घडली. (मद्य पिऊन वाहन चालवणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक) गुजरातच्या दिशेने हा टँकर निघाला होता. टँकरमध्ये केमिकल होते. टँकरचा चालक राजेंद्रसिंह सकट हा नशेत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेत घायाळ झालेल्या लोकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.