वाई (सातारा) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून कॅफेमध्ये बलात्कार !
वाई (जिल्हा सातारा) – लग्नाचे आमीष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वाई शहरातील एका कॅफेमध्ये बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वाई तालुक्यातील कडेगाव येथील समीर सलीम पटेल या युवकाला वाई पोलिसांनी अटक केली आहे. वाई येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन युवतीला समीर पटेल हा लग्नाचे आमीष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध एका कॅफेमध्ये घेऊन गेला आणि वर्षभरात तिच्या मनाविरुद्ध त्याने ५ वेळा शारीरिक संबंध ठेवले. या युवती व्यतिरिक्त अनेक मुलींशी त्याने शारीरिक संबंध ठेवले आहेत. हे या युवतीपासून त्याने लपवून ठेवले होते. पीडित युवती दुसर्या धर्माची आहे, हे ठाऊक असूनही पटेल याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पटेल याच्यावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत आणि अनुसूचित जाती-जमाती अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामहिलांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |