अंबरनाथ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक !
१७ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त !
ठाणे, ८ जानेवारी (वार्ता.) – अंबरनाथ परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या रवि मुन्नीलाल जैस्वाल (वय ३५ वर्षे), हसून कय्युम खान (वय २५ वर्षे) आणि महंमद शॅडं रियाझ (वय २७ वर्षे) यांना ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा ९० किलो गांजा आणि चारचाकी असा १७ लाख ३६ सहस्र ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडतात ! |