हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकलग्न (जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान !
गावाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !
जळगाव, ८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकलग्न (जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर ७ जानेवारीला रात्री व्याख्यान पार पडले. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. विषय ऐकल्यानंतर ‘संपूर्ण गाव हे हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करूया’, यासाठी गावातील सर्वांनीच एकजुटीने अनुमोदन दिले. गावाच्या बाहेर ‘हिंदु राष्ट्र गाव एकलग्न’ असा फलक लावण्याचे नियोजन करण्यात आले. (असे कृतीशील हिंदू सर्वत्र हवेत ! – संपादक)
शेवटी धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण, गोमाता, स्वमाता, धरणीमाता यांच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक धर्मप्रेमी महिला आणि पुरुष उपस्थित होते. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षक श्री. निखिल कदम, हिंदु जनजागृती समितीचे धरणगाव समितीसेवक श्री. विनोद शिंदे उपस्थित होते.