महिला कर्मचार्यांना हिजाब घालण्यास ‘ब्रिटीश एअरवेज’ची अनुमती !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
लंडन – ‘ब्रिटीश एअरवेज’ने कर्मचार्यांच्या गणवेशाविषयीच्या नियमांमध्ये पालट केले आहेत. ब्रिटीश एअरवेजने त्याच्या महिला कर्मचार्यांना हिजाब घालण्याची अनुमती दिली आहे. डिझायनर ओझवाल्ड बोटंंग यांनी महिला आणि पुरुष कर्मचार्यांसाठी कपडे सिद्ध केले आहेत. महिलांना ड्रेस, स्कर्ट किंवा ट्राउझर घालण्याची अनुमती असेल. ‘ब्रिटीश एअरवेज’च्या ३० सहस्र कर्मचार्यांना हा नियम लागू होणार आहे. ब्रिटीश एअरवेजचे अध्यक्ष सीन डॉयल म्हणाले, ‘‘आमचा गणवेश आमच्या आस्थापनाचे प्रतिनिधित्व करतो आणि भविष्यातही ‘आधुनिक ब्रिटन’साठी असेच करत राहू.’’
British Airways Unveils New Uniform That Includes Hijab And Jumpsuit https://t.co/rOCYxSqcA3 pic.twitter.com/ZX3tDXhbPV
— NDTV News feed (@ndtvfeed) January 7, 2023
संपादकीय भूमिका
|