व्यायामासंबंधी क्रम
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३०
१. ‘व्यायाम रिकाम्या पोटी करावा. खाऊन लगेच व्यायाम करू नये. खाल्ल्यावर व्यायाम करायचा झाल्यास दीड ते ३ घंट्यांचे अंतर असावे.
२. व्यायामानंतर लगेच खाऊ नये. न्यूनतम १५ मिनिटे जाऊ द्यावीत. व्यायामानंतर अंघोळ करायची असल्यास तीही १५ मिनिटांनी करावी. ‘व्यायाम, अंघोळ आणि खाणे’, असा क्रम असावा.
३. व्यायामाच्या आधी, व्यायाम करतांना मध्ये मध्ये, तसेच व्यायाम झाल्यावर आवश्यकतेनुसार १ – २ घोट पाणी प्यायल्यास चालते; पण एका वेळेस पुष्कळ पाणी पिऊ नये.
‘मान, खांदा इत्यादी भागांसाठीचे थोडा वेळ करण्याचे व्यायाम आणि फार श्रम होत नाहीत’, असे व्यायाम’, म्हणजे ‘सूक्ष्म व्यायाम’. सूक्ष्म व्यायामांच्या संबंधी हे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२३)