तळपायांना तेल लावा आणि तणावमुक्त व्हा !
‘रात्री झोपतांना तळपायांना कोमट खोबरेल तेल लावून ते जिरवावे. यामुळे रात्रीची झोप अपूर्ण होणे आणि सकाळी आपोआप जाग न येणे, अशा समस्यांमुळे डोळे अन् मेंदू यांवरील ताण अल्प होतो, तसेच मानसिक स्वास्थ्य लाभून झोप शांत लागण्यास साहाय्य होते. तळपायांना तेल लावल्यास ते डोळ्यांसाठी पोषक ठरते. खरे तर पाय आणि पाठ हे शरिरातील दुर्लक्षित भाग असतात; परंतु तळपायांना तेल लावण्याच्या निमित्ताने पावलांची निगा राखली जाते.
पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्यांमध्ये श्रीविष्णूंचे अधिष्ठान असते. त्यामुळे पाय स्वच्छ धुवून ते पुसावेत आणि मग त्यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्वतःची कार्यक्षमता वाढते. हे सर्व लाभ अनुभवण्यासाठी रात्री झोपतांना तळपायांना तेल लावावे.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (८.१२.२०२२)