पाकमध्ये गव्हाच्या पिठावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करत असतांना तेथील सामाजिक स्थिती अत्यंत विदारक होत असल्याचे समोर येत आहे. पाकमधील अर्ध्याहून अधिक कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होऊ लागले आहे. पाकमध्ये प्रतिमण (१ मण म्हणजे ४० किलो) गहू ५ सहस्र रुपयांना, तर गव्हाचे पीठ प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोचले आहे. पाकच्या पंजाबमध्ये १५ किलो गव्हाची पिशवी २ सहस्र २५० रुपयांना विकली जात आहे, तर रेशनमध्ये मिळणार्या २५ किलो गव्हाच्या पिठाची किंमत ३ सहस्र १०० रुपये झाली आहे. याच पिठासाठी सिंध प्रांतातील मीरपूर खासमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
सौजन्य : India Today
संपादकीय भूमिका
|