गुरुमाऊली, ध्यास लागो या जिवा केवळ तुझ्या चरणांचा ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२३.५.२०२१ या दिवशी माझ्या मनाची स्थिती अस्थिर होती. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुदेवांशी आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी सुचवलेली कविता त्यांच्याच चरणकमली अर्पण करते.
हे गुरुमाऊली, कृपेची सावली ।
ने मज दूर या मायारूपी भवसागरातूनी ॥
ध्यास लागो या जिवा, केवळ तुझ्या चरणांचा ।
आस लागो या मना, केवळ तुझ्या वरदहस्ताचा ॥ १ ॥
चित्त हरवू दे तुझ्या नेत्रांमध्ये ।
देह रंगू दे तुझ्याच भजनांमध्ये ॥
हृदयात राहो अखंड तुझेच ध्यान ।
स्मरणात असू दे सदा तुझे रूप महान ॥ २ ॥
मन होते रे विचलित या सर्वांतूनी ।
जेव्हा जन्मोजन्मीच्या स्वभावदोषांचे संस्कार येती उफाळूनी ॥
दे मजला बळ, या सर्व स्वभावदोषांशी लढण्यास ।
तेव्हाच होईन मी पात्र तुझ्या पावन चरणांची धूळ होण्यास’ ॥ ३ ॥
– कु. सायली पाटील, जळगाव (२३.५.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |