कोलकाता येथून इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक
कोलकाता (बंगाल) – येथून इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने अटक केली. महंमद सद्दाम आणि सईद अहमद अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करणे, स्फोटके गोळा करणे, तसेच आतंकवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्याचा आरोप आहे. या दोघांच्या घरातून भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जिहादी साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी साहित्य जप्त करण्यात आले.
#WestBengal: Two suspected Islamic State-linked terrorists arrested in #Howrah https://t.co/yClXQyYQbI
— DNA (@dna) January 7, 2023
संपादकीय भूमिकाअशांना फाशीची शिक्षा मिळाल्यास अन्य आतंकवाद्यांवर वचक बसेल ! |