(म्हणे) ‘भाजप तिरंगा हटवून देशाचा राष्ट्रध्वज भगवा करणार !’
मेहमूबा मुफ्ती यांचा थयथयाट
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भाजप सरकारने काश्मीरचा ध्वज काढून टाकला, राज्यघटनेत पालट केला, कलम ३७० रहित केला आणि लवकरच ते देशाची राज्यघटना पालटणार आहे. तसेच देशाचा राष्ट्रध्वज भगवा करणार आहे, अशी टीका जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.
‘जम्मू कश्मीर का झंडा छीना, तिरंगा की जगह भगवा को राष्ट्रीय ध्वज बना देगी BJP’, महबूबा मुफ्ती का वार – Aaj Takhttps://t.co/i7OxqmFlbu#NewsIndia pic.twitter.com/3ijkkydc03
— NEWS INDIA (@NEWSWORLD555) January 8, 2023
मेहबूबा मुफ्ती यांनी ‘लडाख जम्मू-काश्मीरचा अविभाज्य अंग आहे. त्याला पुन्हा काश्मीरशी जोडले पाहिजे. जम्मू-काश्मीर म. गांधी यांच्या भारताच्या समवेत जोडला गेला होता, नथुराम गोडसे यांच्या भारताशी नाही’, असे म्हटले.
संपादकीय भूमिकाभारताची फाळजी धर्माच्या आधारे झाली आणि पाकिस्तान नावाचा इस्लामी देश निर्माण झाला. त्याने धर्माच्या आधारे प्रत्येक गोष्ट केली, ध्वजही धर्माच्या आधारे हिरवा ठेवला. भारत धर्माच्या आधारे हिंदु राष्ट्र होणे अपेक्षित असतांना तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता ! |