व्हिसा संपूनही रहाणार्या आफ्रिकी लोकांना कह्यात घेतल्यावर आफ्रिकी जमावाकडून देहली पोलिसांवर आक्रमण
नवी देहली – दक्षिण देहलीतील पोलिसांनी ७ जानेवारीला दुपारी ३ च्या सुमारास राजू पार्क परिसरातून ३ आफ्रिकी नागरिकांना पकडले होते. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली असूनही ते भारतात राहत होते. या वेळी आफ्रिकन वंशाच्या १०० हून अधिक लोकांच्या जमावाने पोलीस पथकाला घेरले आणि त्यांना मारहाण केली. या घटनेचा अपलाभ घेत पोलिसांच्या कह्यातील आरोपी पळून गेले; मात्र यांतील एक आरोपी फिलिप याला पोलिसांनी पुन्हा पकडले.
Huge Mob Attacks Delhi Cops After 3 Nigerians Detained For Overstaying https://t.co/VZiua86cVj pic.twitter.com/OddxtrYqZL
— NDTV (@ndtv) January 8, 2023
या घटनेनंतर सायंकाळी साडेसहा वाजता संयुक्त पथक पुन्हा राजू पार्कमध्ये गेले. येथून त्यांनी नायजेरियाच्या ४ नागरिकांना पकडले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या जमावाने पोलिसांना घेरले. या वेळी त्यांची संख्या १५०-२०० च्या आसपास होती. या लोकांनी आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र या वेळी पोलिसांचे पथक सतर्क होते. पथकाने परिस्थिती हाताळून आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|